शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सुधारित नियमावलीबाबत रंगकर्मींसह सर्वांचाच नाराजीचा सूर कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:44 AM

गतवर्षी सुधारित नियमावली लागू केल्यापासून नाट्य व्यावासायिक, हौशी रंगकर्मी, नाट्य परिषदेपासून ते कलाकारांपर्यंत असे नाट्य वर्तुळातील बहुतांश घटक या नियमावलीबाबत नाराज आहेत.

नाशिक : गतवर्षी सुधारित नियमावली लागू केल्यापासून नाट्य व्यावासायिक, हौशी रंगकर्मी, नाट्य परिषदेपासून ते कलाकारांपर्यंत असे नाट्य वर्तुळातील बहुतांश घटक या नियमावलीबाबत नाराज आहेत. त्यामागे काही तांत्रिक बाबींबरोबरच दरवाढ हेच घटक कारणीभूत असले तरी दरवाढीनंतरही कालिदास आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नसेल तर त्याबाबत काही वेगळे पर्याय शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.एकीकडे सुधारित नियमावली आल्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याची नाट्य व्यावसायिकांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे कालिदासच्या उत्पन्नात सरासरी २० लाखांची घट झाली, हेदेखील वास्तव आहे. एका दृष्टीने बघितल्यास या दोन्ही बाबी परस्पर भिन्न असल्यासारखे भासते. मात्र, त्याचबरोबर त्यात काही संगती असल्याचेही दिसून येते. काही प्रमाणात झालेल्या दरवाढीमुळे नाटकांचे कमी झालेले प्रमाण, तसेच प्रत्यक्ष सभागृहात खानपान बंदी असल्याने शालेय गॅदरिंग, कंपन्यांचे गेट टुगेदर, पुरस्कार वितरण कालिदासमध्ये बंद असण्यासह कालिदासच्या अद्ययावततेबाबतची अनभिज्ञता या सर्व बाबींचा परिणाम कालिदासच्या उत्पन्नावर झाला आहे.नाटकांच्या पूर्वतयारीसाठी नाटकापूर्वीच्या वेळेत वाढ, आॅफलाइन तारखा देणे, वाढीव भाड्यात कपात, लहानसहान उपकरणांसाठी आणि सुविधांसाठी स्वतंत्र शुल्क आकारू नये तसेच प्रत्येक वेळी अनामत शुल्क घेण्याऐवजी एकदाच अनामत रक्कम जमा करून घ्यावी यांसह अन्य काही मागण्या नाट्य व्यावसायिकांकडून महापालिकेला करण्यात आल्या आहेत. गत आठवड्यात प्रशांत दामले हे नाटकासाठी आले असतानाही त्यांच्या माध्यमातून निवेदन देऊन या मागण्या मांडण्यात आल्यावर आयुक्तांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही त्याबाबत काही निर्णय किंवा बैठका घेऊन तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आलेली नाहीत.आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी व्हावा विचारजी संस्था, आस्थापना किंवा व्यवस्था आत्मनिर्भर असते, तीच प्रदीर्घ काळ सुव्यवस्थितपणे संचलनात राहते. ही बाब लक्षात घेऊनच यापुढे कालिदासबाबत विचार होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कालिदास आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी कसे होईल, त्याबाबत नाट्यवर्तुळाशी निगडीत प्रत्येक घटकाशी स्वतंत्रपणे किंवा त्यांना एकत्रित करून काय करता येईल, त्याबाबत विचार होण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका