सिन्नर : महाराष्टÑ क्रांतीसेना पक्षाचा जिल्हा मेळावा उत्साहात पार पडला. नाशिक येथील माऊली लॉन्स येथे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्याचा मेळावा संपन्न झाला.संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपिठावर चंद्रकांत गरूड, परेश भोसले, चंद्रकांत सावंत, प्रदीप जाधव, बाळासाहेब गुंजाळ, नितीन देसले, शरद शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडी सरकारसह सेना-भाजपाच्या विद्यमान सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक करण्यापलीकडे काही केले नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीसेना पक्ष स्थापण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकरी कामगार, बेरोजगारांच्या प्रश्नावर क्रांतीसेना काम करणार असून बहुजनांच्या हित रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत असा इशारा पाटील यांनी दिला. आगामी काळात येणाºया विधानसभेच्या निवडणुकीत येवला, नाशिक, सिन्नरसह जिल्ह्यातील सर्व जागांवर पक्ष उमेदवार देणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली.जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असून उपाययोजना करायला शासन कमी पडत असल्याचा आरोप नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी केला. दुष्काळी तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्टÑ क्रांती सेना पक्षाचा जिल्हा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 5:48 PM