शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

प्रादेशिक परिवहन विभाग : वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक

By admin | Published: December 19, 2014 12:44 AM

करारनामा संपल्याने स्मार्टकार्ड बंद

पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी केल्यानंतर वाहनधारकांना देण्यात येणारे स्मार्टकार्ड कंपनीचा करारनामा संपल्याने बंद करण्यात आले आहे. आरटीओत वाहन नोंदणी केल्यानंतर स्मार्टकार्डऐवजी आता प्रिप्रिंटेड स्टेशनरी ( संगणकीय प्रत) दिली जात आहे मात्र स्मार्टकार्डच्या नावाखाली वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक केली जात असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. शासनातर्फे काही वर्षांपूर्वी प्रिप्रिंटेड स्टेशनरी बंद करून त्याऐवजी वाहनधारकांना स्मार्टकार्ड देण्याची सुविधा करण्यात आली होती. या स्मार्टकार्डसाठी विशेष शुल्क वाहनधारकाकडून आकारले जायचे. सर्वच कागदपत्रे एकाच कार्डवर असल्याने वाहनधारकांची गैरसोय यानिमित्ताने टळायची; परंतु आता स्मार्टकार्डच बंद झाल्याने वाहनधारकांना वाहनांबाबतची सर्व कागदपत्रेबरोबर ठेवावी लागत आहे. स्मार्टकार्डचा ठेका रोजमार्ट या कंपनीला देण्यात आलेला होता; मात्र काही दिवसांपूर्वीच करारनामा संपल्याने कंपनीने स्मार्ट कार्ड देणे बंद केले आहे. त्यामुळे आता आरटीओत नवीन वाहनांची नोंदणी तसेच अन्य वाहनासंबंधित कामांसाठी वाहनधारकांना संगणकीय प्रत दिली जात आहे. करारनामा संपण्यापूर्वी ज्या वाहनधारकांनी वाहनांची नोंदणी केली तसेच त्यासाठीचे शुल्क भरले आहे. त्यांना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून स्मार्टकार्ड बंद झाल्याने आता वाहनासंबंधित नोंदणी करणाऱ्या वाहनधारकांना संगणकीय प्रत दिली जात आहे. रस्त्याने वाहने नेताना वाहन तपासणीदरम्यान वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहने अडवून कागदपत्रे मागितली; तर संबंधित वाहनधारकांनी कागदपत्रे दाखवूनही वाहतूक पोलीस स्मार्टकार्ड दाखवा नाही, तर दंड भरा, अशी भूमिका घेत असल्याने वाहनधारकांना कागदपत्रे असूनही विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)