जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील सूचनेप्रमाणे कोरोनाकाळात बाजार समितीचे लिलाव कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी सोमवारी (दि.२४) मुख्य आवार येवला येथे ५०० (ट्रॅक्टर) व उपबाजार अंदरसुल येथे ३०० (ट्रॅक्टर) कांदा लिलावासाठी (फक्त ट्रॅक्टर) वाहनांची नोंदणी रविवारी मोबाइलवर केली जाणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर सदर मोबाइल बंद करण्यात येतील. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सोमवारी (दि. २४) बाजार समितीच्या गेटवर नंबरची खात्री करून सकाळी ६ वाजेनंतर प्रवेश दिला जाणार आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी सदर दिवशी सकाळी ६ ते ९.३० पर्यंत वाहन आणावे. नंतर आलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. शेतकरी बांधवांनी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य प्रशासक पवार, सचिव
कैलास व्यापारे व प्रशासकीय मंडळ सदस्यांनी केले आहे.