ठळक मुद्देसिन्नरला दारिद्र्य निर्मूलनासाठी पुढाकार
नगर परिषदेद्वारे केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी करण्याचे कार्य चालू आहे. शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलन करणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अभियानाच्या माध्यमातून शहरी गरीब व्यक्तींना उदरनिर्वाहाकरिता विविध घटकांद्वारे साहाय्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर या माहितीचे संकलन केले जात आहे.फिरता निधी वितरितडिसेंबरअखेर २२८ बचतगट स्थापन करण्यात आले असून, ११ वस्तीस्तरीय संघ व १ शहरस्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. जवळपास २५१८ महिलांचे संघटन झाले आहे. २१९ प्रत्येकी १० हजार याप्रमाणे २१ लाख ९० हजार रुपयांचा फिरता निधी अभियानांतर्गत वितरित करण्यात आला आहे.