पंचवटी : तीन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीचे सावट अजून कायम असले तरी आॅटोमोबाईल क्षेत्रात हळूहळू तेजी दिसू लागली असून, २०२० या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांनी नवीन वाहनांची खरेदी करत प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केली आहे. या नवीन वाहन नोंदणीच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत तब्बल १६ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी चारचाकी वाहनांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाहन उद्योगाकडून चारचाकी, दुचाकी खरेदीवर विशेष सवलत दिली जाते. तसेच ग्राहकांचा कलदेखील नवीन वर्षात वाहन खरेदीकडे असतो.नववर्षानिमित्त खरेदीचा पसंतीयंदादेखील नववर्षात ग्राहकांनी वाहनखरेदीला बऱ्यापैकी पसंती दिली असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३५५९ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यात जवळपास १८३५ दुचाकी वाहनांचा समावेश आहे तर १७७ तीनचाकी, २९२ मालवाहतूक तर ९३७ कार, दोन रुग्णवाहिका, ११ बस, डंपर ८, ट्रॅक्टर १८५, ट्रेलर ९१ व इतर अशा जवळपास १५४७ वाहनांची नोंद झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन नोंदणीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत महसूल वाढला आहे. वाहन खरेदी वाढल्याने रस्त्यावर वाहन संख्या वाढली त्यामुळे धोका वाढला आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. चारचाकी चालविताना शीट बेल्टचा वापर करावा. ग्राहकाने नवीन दुचाकी वाहन खरेदी केल्यावर संबंधित शोरूममधून ग्राहकांना दोन हेल्मेट मिळतात त्याची रक्कम महसुलात वसूल केली जाते. त्यामुळे दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट परिधान करावे.- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
साडेतीन हजार वाहनांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:00 AM
तीन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीचे सावट अजून कायम असले तरी आॅटोमोबाईल क्षेत्रात हळूहळू तेजी दिसू लागली असून, २०२० या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांनी नवीन वाहनांची खरेदी करत प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केली आहे. या नवीन वाहन नोंदणीच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत तब्बल १६ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
ठळक मुद्देआरटीओला अच्छे दिन : पंधरा दिवसांत सोळा कोटींचा महसूल जमा