लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार ते शुक्रवार अशी नियमित कांदा शेतमालाची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली.कोरोनाच्या काळात बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून आठवड्यातील काही दिवसच कांदा शेतमालाचे लिलाव सुरू होते. त्यासाठी शेतकऱ्यांना टोकन पद्धत सुरू करण्यात आली होती.मात्र आता आठवड्यातील पाचही दिवस नियमितपणे विनाटोकन कांद्याचे लिलाव होणार आहेत. आठवड्यातील अवघे दोन किंवा तीन दिवस कांद्याचे लिलाव सुरू ठेवल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यावर उपायोजना करण्यासाठी नियमित पाचही दिवस लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शेतकºयांनी लिलावासाठी एकाच वेळी गर्दी करू नये, टप्प्याटप्प्याने शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणावा, बाजार समितीत येताना मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सिन्नरला कांद्याचे नियमित लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 9:33 PM
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार ते शुक्रवार अशी नियमित कांदा शेतमालाची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली.
ठळक मुद्दे नियमित पाचही दिवस लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला