शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

दोनवेळ पाणीपुरवठ्यास प्रशासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:58 PM

मनपा व्यवस्था सुरळीत : शिवसेनेची मागणी फेटाळली नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.

मनपा व्यवस्था सुरळीत : शिवसेनेची मागणी फेटाळली

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.यंदा गंगापूर धरणासह मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे, शहरात दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली होती. परंतु, सद्यस्थितीत शहरात एकवेळ सुरू असलेला पाणीपुरवठा योग्य असल्याचे समर्थन प्रशासनाने केले आहे. सद्यस्थितीत पंचवटी, नाशिकरोड तसेच पूर्व विभागातील काही भागांत दोनवेळ पाणीपुरवठा केला जात आहे, तर अन्यत्र एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. सर्वसाधारणपणे दीड ते अडीच तास पाणीपुरवठ्याची वेळ आहे. शहरात १०९ जलकुंभ असून ते भरण्याकरिता लागणारा वेळ आणि वितरण व्यवस्थेकरिता आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ पाहता दोनवेळ पाणीपुरवठा करणे शक्यच नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. शहरात दोनवेळ पाणीपुरवठा केल्यास वितरण व्यवस्था विस्कळीत होऊन नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे सद्यस्थितीत व्हॉल्व्हमनची संख्याही अपुरी आहे. अशा स्थितीत दोनवेळ पाणीपुरवठा अशक्य असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेने दोनवेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली असताना पक्षाचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी मात्र सिडको भागात दोनवेळ पाणीपुरवठा तांत्रिकदृष्ट्या होऊच शकत नसल्याचे स्पष्ट मत सिडको प्रभाग समिती सभेत व्यक्त केले आहे. त्यामुळे दोनवेळ पाणीपुरवठ्याच्या मागणीवरून सेनेतच मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे.दिवाळीत अर्धातास वेळ वाढविणार दिवाळीचा उत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी साफसफाईला वेग येणार आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढणार आहे. पाण्याची मागणी लक्षात घेता पाणीपुरवठ्याची वेळ अर्धातासाने वाढविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. सध्या प्रतिदिन ४३० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल धरणातून केली जात आहे.