नािशक : शासकीय रुग्णालयांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘कायाकल्प’ या स्पर्धेंतर्गत तीन सदस्यीय राज्यस्तरीय समितीने मंगळवारी (दि़ ७) जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी केली़ या समितीने रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाºया सोयी-सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली़ गतवर्षी जिल्हा रुग्णालयाने कायाकल्प योजनेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते़राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष पुण्याचे सहायक उपसंचालक डॉ. विजय बाविस्कर, डॉ. मयूर चन्ने, सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र शिंगे यांच्या समितीने जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी केली. मंगळवारी सकाळी ९ वाजताच ही समिती तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी समितीचे स्वागत केले.
‘कायाकल्प’ स्पर्धा : सोयी-सुविधांबाबत घेतली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:20 AM