नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयात सरस्वती मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना विधिवत पूजन करून करण्यात आली.स्व. सुधाकर पाटील यांनी दिलेली ही प्राचीन सरस्वतीची मूर्ती सावाना कार्यालयात प्रवेश करण्याच्या मार्गावर सुमारे १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आली होती. ३ वर्षांपूर्वी नूतनीकरणाची कामे करताना सदर मूर्ती तेथून काढून वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली होती. सदर मूर्ती पूर्वीच्याच जागेवर प्रतिष्ठापित करण्यात यावी, अशी अनेक सभासदांची मागणी होती. सभासदांची मागणी लक्षात घेऊन वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने संगमरवरी मंदिर तयार करून तेथे विधिवत पूजन करून मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. सावानाचे नाट्यगृह सचिव अॅड. अभिजित बगदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पौराहित्य सुरेंद्र पुजारी यांनी केले. यावेळी लीलाधर पाटील, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, नानासाहेब बोरस्ते, डॉ. धर्माजी बोडके, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सावानात सरस्वती मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:17 AM