नाशिक : मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करण्याबरोबरच नव्या मैत्रीचा अध्याय सुरू करणाऱ्या रेशीम धाग्याच्या साक्षीने मैत्रीचे नाते विणले गेले. नेहमीच गजबजणाºया कालेजरोडवर तरुण-तरुणींमधील उत्साह रविवारमुळे दिसून आला नसला तरी सोमेश्वर आणि नवीन गोदापार्क परिसरात मैत्री सोहळ्याला चांगलेच उधाण आले होते.फ्रेण्डशिप डे निमित्ताने मैत्र भावना व्यक्त करण्याचा हा सोहळा केवळ कॉलेज तरुण-तरुणींपुरताच मर्यादित नाही तर अनेक ठिकाणी घरोघरी आई आणि मुलींनीदेखील एकमेकींना मैत्रबंध बांधले. कुणी आपल्या खेळण्यांना तर कुणी वाहनांना मैत्रबंध बांधून मैत्रीचे नाते जपले. फ्रेण्डशिप दिनी आपल्या मित्राविषयी आपुलकीची भावना व्यक्त करणारे नानाविध रंगांचे झगमगीत असे रिबीन एकमेकांना बांधून मैत्रीभावना व्यक्त करण्यात आली. रविवारचा दिवस असल्याने तरुणांचा उत्साह कमी दिसला.तरुणाईचा जल्लोषकॉलेजरोडवर काहीशी शांतताच होती. मात्र नवीन गोदाघाट परिसर, सोमेश्वर, गंमत-जंमत, गंगापूर बॅक वॉटर या ठिकाणी तरुणाईचा जल्लोष काहीकाळ दृष्टीस पडला. गंगापूररोडवरील अनेक स्कॅक्स पॉइंट, मिसळ पॉइंटवर तरुणाईने मैत्र दिन साजरा केला. सेल्फीचा आनंद घेत मैत्र दिन साजरा केला.
मैत्रीच्या नात्यांना रेशीम धाग्यांचे बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:44 AM
नाशिक : मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करण्याबरोबरच नव्या मैत्रीचा अध्याय सुरू करणाऱ्या रेशीम धाग्याच्या साक्षीने मैत्रीचे नाते विणले गेले. नेहमीच गजबजणाºया कालेजरोडवर तरुण-तरुणींमधील उत्साह रविवारमुळे दिसून आला नसला तरी सोमेश्वर आणि नवीन गोदापार्क परिसरात मैत्री सोहळ्याला चांगलेच उधाण आले होते.
ठळक मुद्दे वाहनांना मैत्रबंध बांधून मैत्रीचे नाते जपले