लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जावीत, यासाठी दोनशे किलोमीटर अंतराची व १६०० मे. टन ही एका रेल्वे मालवाहतूक गाडीची मर्यादा असल्याने व सध्या एकाच वेळी एकाच बाजारपेठेत हा माल गेला तर कमी भाव मिळून नुकसानीची भीती असल्याने कांदा व केळी पाठविण्यास व्यापारीवर्ग तयार नव्हते. ही बाब समजताच राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचीव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने संपुर्ण भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरिता सुधारित आदेश जारी केला आहे.नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी दि. १६ एप्रिलपासून दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत ४२ वॅगन्समधून ८०० मेट्रिक टन वाहतूकीस व दोन माल उतरविणेचे परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
रेल्वे वाहतुकीच्या नियमात शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:02 AM
नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.
ठळक मुद्देकांदा-केळी : आजपासून होणार अंमलबजावणी