चांदवड : तालुक्यातील तळेगावरोही येथील नागरिकांनी सहा ते सात कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या पिल्लाची सुटका केली व जीव वाचवला.
तळेगावरोही येथील शेत गट नंबर ७०६ या शेतात पाण्यासाठी वणवण भटकत असणाऱ्या हरणाच्या पिल्लाच्या पाठीमागे सहा ते सात कुत्रे जीवघेणा हल्ला करीत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. तळेगावरोही येथील कॉ. सुखदेव केदारे, दिलीप केदारे, गणेश मोरे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कुत्र्यांचा पाठलाग करून हरणाच्या पिल्लाचा जीव वाचविला. त्यानंतर सुखदेव केदारे यांनी चांदवड वन विभागात संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांनी येवला विभागाची संपर्क करून वनरक्षक नवनाथ बिन्नर विसापूर व बाळू सोनवणे, वनसेवक यांच्याकडे हरणाच्या पिल्लाला देण्यात आले. त्यानंतर संबंधित वन कर्मचारी पिल्लाला चांदवड तालुक्यातील वागदर्डी रोपवाटिका येथे औषधोपचारासाठी घेऊन आले.