नाशिक : करोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे.मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना बजवावी लागत असलेली ही सेवा त्वरित रद्द करावी, अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. माध्यमिक शिक्षकांना लाॅकडाऊन कालावधीत जिल्हा सीमेवरील तपासणी नाका, विलगीकरण केंद्र, कंन्टेंमेंन्ट झोन, स्वस्त धान्य दुकान येथे सेवा करावी लागत आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी शिक्षकांचे विलगीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे करोना ड्युटीपासुन शिक्षकांची मुक्तता करावी, अशी मागणी विधानपरिषदेच्या शिक्षक प्रतिनिधींनी केली आहे. जिल्हयातील माध्यमिक शिक्षक संघटनेने मंगळवारी(दि.२४) रोजी अशा स्वरुपाची मागणी केली होती. संबंधितांना निवेदनही दिलेले आहे. यासंबंधीचा आदेश त्वरित निघेल, अशी अपेक्षा संजय गिते, चंद्रकांत कुशारे, कैलास भारती, समीर जाधव, बाळासाहेब देवरे, मुकुंद जाधव, लक्ष्मण पडोळ यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , आमदारांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 2:21 PM
माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.
ठळक मुद्देशिक्षकाना कोरोना सेवेतून मुक्त करा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन