सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी दाखवली त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रु पाली, एक हजार आठ अश्या नामवंत भाताच्या वाणांच्या रोपांची पेरणी केली.
या सोबतच उडीद, सोयाबीन, भुईमुग, खुरासणी आदी पिकांसोबत शेतकºयांनी बागायती भाजीपाला पिकांची जोरात लागवड केली होती, परंतु जूनच्या सुरु वातीलाच वरूणराज्याने दमदार हजेरी लावल्यानंतर आजपर्यंत पाऊसच पडला नाही, या कारणास्तव तालुक्यातील शेतकरी राजा हवालदिल झाला. अनेक शेतकºयांची जून, जुलै, आॅगस्ट पर्यंत केवळ पावसाच्या पाण्यावाचून भाताची रोपे कडाक्याच्या उन्हामुळे पिवळी झाली व अनेकांच्या भाताच्या रोपांचे नुकसानही झाले, तसेच अनेक शेतकºयांनी शेतात पिकांसाठी भरमसाठ खर्च करूनही त्यांना केवळ पावसाच्या पाण्यावाचून आजपर्यंत भात लागवड करता आली नाही.
मात्र इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील भाताची लागवड अद्यापही झालेली नव्हती. शेतकºयाला तब्बल तीन महिने पावसाची प्रतीक्षा करावी लागली. टाकेद परिसरातील अनेक गांवातील शेतकरी, वारकºयांनी चक्क पाऊस पडावा म्हणून दिंडी काढून हरी नामाच्या जय घोष करीत टाकेद येथील सर्वतीर्थावर जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांना साकडे देखील घातले होते. अन दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली अन् भात लागवडीसाठी शेतकºयांची तारांबळ उडाली.
बुधवारी (दि.१२) मध्यरात्रीपासून टाकेद परिसरात बरसत राहिलेल्या मुसळधार पावसाने दमदार सुरु वात केल्याने इगतपुरी सह टाकेद परिसरातील नद्या, नाले, ओहळ वाहायला सुरु वात झाली आहे. या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भाताच्या लागवडी वाचून बेरोजगार होऊन घरी बसून रोजगाराच्या शोधार्थ असलेला मजूर वर्ग आज पुन्हा शेतातील कामांत व्यस्त झाला आहे. जणू काही दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शेतकºयांनी व रोजंदारीने शेतात काम करणाºया मजूर वर्गाने मोकळा श्वास घेतला.
टाकेद परिसरात भाताची लागवड करण्यासाठी शेतकºयांची लगबग तर अनेक शेतकरी विहिरीच्या पाण्यावर लागवड केलेल्या भात शेतीला खतांचा मारा करतांना दिसत आहे.(फोटो १३ टाकेद,३ )टाकेद परिसरात भात लागवड करतांना मजुरांसमवेत शेतकरी.