नाशिक : ‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हैं हम वतन हैं हिंदोस्ता हमारा...’ या ओळींचा प्रत्यय स्वातंत्र्य दिनानिमित्त वडाळागाव परिसरात आला. येथील मुख्य जामा गौसिया मशिदीच्या प्रवेशद्वारावर मदरशाची मुले, धर्मगुरू, मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन राष्टÑीय ध्वज अभिमानाने फडकावला.स्वार्थापोटी काही राजकीय पुढारी राष्ट्र आणि धर्म या बाबींवरून राजकारण करत स्वत:च्या पोळ्या भाजून घेतात आणि समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. वस्तुस्थिती मात्र वेगळीच असते. सर्वसामान्यांना जेवढा धर्म महत्त्वाचा वाटतो तेवढा किं बहुना त्यापेक्षाही अधिक आपला देश प्रिय वाटतो. राष्टÑीय एकात्मतेला बळकट करण्यासाठी शहरातील मदरसे, मशिदींच्या आवारातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.वडाळागावातील मदरसा दारुल उलूम गौसिया फैजाने मदारचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात हातात तिरंगा घेऊन मशिदीच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या तिरंग्यापुढे जमले. प्रारंभी हाफीज साबीर रजा यांनी आपल्या खास शैलीत ‘सारे जहां से अच्छा...’ हे गीत सादर केले. त्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. दरम्यान, धर्मगुरू मौलाना हाफीज जुनेद आलम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना...एकात्मतेसाठी दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 9:45 PM
जामा गौसिया मशिदीच्या प्रवेशद्वारावर मदरशाची मुले, धर्मगुरू, मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन राष्टÑीय ध्वज अभिमानाने फडकावला.
ठळक मुद्देदारुल उलूम गौसिया फैजाने मदारचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात मशिदीच्या प्रवेशद्वारावर जमलेखास शैलीत ‘सारे जहां से अच्छा...’ हे गीत सादर धर्मगुरू मौलाना हाफीज जुनेद आलम यांच्या हस्ते ध्वजारोहण मशिदींच्या आवारातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम