नाशिक : समर्थ सद्गुरू ढगे महाराज ट्रस्टच्या वतीने ढगे महाराज निजधाम गमन पुण्यतिथी व दत्तजयंती उत्सव सोहळा ढगे महाराज स्मारक मंदिर, गोदाघाट येथे संपन्न झाला. याप्रसंगी माधव महाराज राठी यांचे दत्तात्रेय यांच्या विविध अवतारांवर प्रवचन संपन्न झाले. तर रामदास महाराज शिलापूरकर यांचे गुरूतत्त्वाचा महिना या विषयावर आणि दामोदर महाराज गावले यांचे महर्षी व्यास प्रणित पंचमवेद या विषयावर प्रवचन झाले. तसेच रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी शिल्पा पंडित, दीप्ती पुजारी, विनया कुलकर्णी यांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष प्रतापराव पवार, अनंत ढगे, श्रीकांत ढगे, शरदराव धोंगडे, भाऊसाहेब फुले, लक्ष्मीकांत शेंडे, रमेश कडलग, मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते.
ढगे महाराज पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:10 IST