नाशिक : सूर्य देवतेची उपासना करणारे व्रत म्हणून ओळखल्या जाणाºया छटपूजेसाठी गुरुवारी (दि. २६) गोदाकाठी हजारो उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि उपासनेला सुरूवात केली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पर्वाची शुक्रवारी (दि. २७) सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन सांगता होणार आहे. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि मनोकामनापूर्तीसाठी हे व्रत करण्यात येते. छटपर्व अंतर्गत व्रताच्या तिसºया दिवशी गुरुवारी संध्याकाळी मावळत्या सूर्याला दुधाचे अर्घ्य तसेच श्रीफळ, केळी, ऊस यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. नदीकाठी ही पूजा करायला महत्त्व असल्याने गुरुवारी सकाळपासूनच पूजा मांडण्यासाठी जागा मिळावी, या उद्देशाने महिलांनी गांधीतलावापासून रोकडोबा पंटागणापर्यंत नदीच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दाम्पत्य ही पूजा करीत असल्याने पारंपरिक प्रथेनुसार छटपूजेसाठी लागणारे साहित्य डोक्यावर धरून एका टोपलीत पूजेच्या ठिकाणापर्यंत पुरूषांनी आणि महिलांनी या पूजेची मांडणी करत आरती आणि प्रार्थना केली.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने धार्मिक विधी छटपूजा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:02 AM