कोरोना रूग्णसंख्येत सातत्याने होणारी वाढ तसेच आरेाग्य सुविधा मिळत नसल्याने रूग्णांचा जीव धाेक्यात आलेला आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने रूग्णांना इतरत्र हलवावे लागत आहे तर इंजेक्शनसाठी रूग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागलेल्या आहेत. दुसरीकडे मात्र त्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाही परिस्थितीत सुधारणा होतांना दिसत नाही. प्रशासनाकडून गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे.
शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी १८ बेड पडून आहेत. तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे नातेवाईक यांना ऑक्सिजन नसल्यामुळे इतर रुग्णालयात हलविण्याच्या सूचना देत आहेत. याबाबत फरांदे यांनी स्वत: अन्न व औषध प्रशासन अधिकारी माधुरी पवार यांना फोन करून कल्पना दिली असता त्यांनी ही जबाबदारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास यांच्याकडे असल्याचे सांगितले. श्रीवास यांना विंनती करूनही सदर रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा झालेला नाही. यावरून शहरातील करोना परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे समोर येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.