शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

१७०० हेक्टरवरील पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 4:22 PM

सायखेडा : दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात घेता निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील काही गावे आणि सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त गावांना वरदान ठरलेल्या कडवा कालव्याला १ डिसेंबरपासून २६ ते २७ दिवसांचे आवर्तन सोडण्यात आल्याने १७०० हेक्टरवरील रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे कडवा कालव्याला आवर्तन सुटले : ८५० दशलक्ष घनफूट पाणी सोडणार

सायखेडा : दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात घेता निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील काही गावे आणि सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त गावांना वरदान ठरलेल्या कडवा कालव्याला १ डिसेंबरपासून २६ ते २७ दिवसांचे आवर्तन सोडण्यात आल्याने १७०० हेक्टरवरील रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे.१६८० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या कडवा धरणात सध्या १३५० दशलक्ष घनफूट जलसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ८५० दशलक्ष घनफूट पाणी सिंचन आणि बिगरसिंचनासाठी वापरण्यात येणार आहे, तर उर्वरित जलसाठा दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. कालव्याला आज प्रारंभी २७५ क्यूसेकने विसर्ग सुरू असून, अखेरपर्यंत ३५० क्युसेसपर्यंत सोडण्यात येणार आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या कडवा कालवा क्षेत्रातील २६ गावांना याचा फायदा होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शरद गायधनी यांनी दिली आहे.यंदा पावसाचे प्रमाण अल्प असल्याने कडवा कालवा परिक्षेत्रातील विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठला आहे. पाण्यामुळे खरीप हंगामातील पिकेदेखील करपून गेली होती. सोयाबीन, मका, ऊस, कांदे या नगदी पिकांना पाणी नसल्याने भांडवली खर्चसुद्धा पाण्यात गेला. थोड्याफार प्रमाणात असलेल्या फळबागा वाचविण्यासाठी आणि रब्बी हंगामातील हरभरा, गहू, उन्हाळी कांदा यासाठी कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे अनेक दिवसांपासून केली होती. मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत कडवा कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी आमदार अनिल कदम यांनी सातत्याने लावून धरली होती. दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी पाणी आरक्षित असल्याने केवळ ८५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ डिसेंबरपासून आवर्तन सोडण्यात आले.दुष्काळाच्या झळा असल्या तरी कडवा कालव्याला आलेले पाणी शेतकºयांना दिलासा देणार आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सध्यातरी सुटला आहे. त्यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे--------------------------कडवा धरणातून सिंचन आणि बिगरसिंचनासाठी ८५० दशलक्ष घनफूट पाणी कडवा कालव्याला सोडण्यात आले असून, हे आवर्तन साधारणत: २६ ते २७ दिवस सुरू राहणार आहे. उर्वरित जलसाठा आरक्षित असल्याने सोडण्यात येणार आहे. आज ७५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. क्षमता लक्षात घेता अखेरपर्यंत ३५० क्युसेसपर्यंत विसर्ग होऊ शकतो.- शरद गायधनी, मुख्य कार्यकारी अभियंता---------------------------दुष्काळी स्थितीमुळे विहिरींनी तळ गाठला होता. खरीप हंगामातील पिके तर वाया गेलीच, रब्बी हंगामातील पिकेही पाण्याअभावी करपून चालली होती. फळबागा वाचवणे जिकिरीचे होऊन बसले होते. अशा परिस्थितीत कडवा कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी आमदार अनिल कदम यांच्याकडे वारंवार केली होती. कालव्याला पाणी आल्याने मोठा आधार आला आहे.-भाऊसाहेब कमानकर, शेतकरी------------------------पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. कडवा लाभक्षेत्रातील शेतकºयांनी हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येऊन पाणीवापर संस्था स्थापन केली पाहिजे. म्हणजे भविष्यात मागणी वाढेल आणि पाणी आरक्षित होईल. यासाठी परिसरातील शेतकºयांनी पुढाकार घेतला आहे. लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांनी भेंडाळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा.- गोरख खालकर, भेंडाळी