नाशिक : अचानक उद्भवणाºया पक्षघात या आजारावर तातडीने उपचार केले तरच त्याचा फायदा होतो. उशिरा करण्यात येणाºया उपचाराचा उपयोग होण्याऐवजी नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते, त्यामुळे वेळीच उपचारासाठी पुढाकार घेतला जावा, असा सल्ला जागतिक पक्षघात दिनाच्या पार्श्वभूमीवर मेंदूविकार तज्ज्ञांनी दिला आहे. या आजाराची लक्षणे सहजगत्या लक्षात येण्यासारखी असून, रुग्णांनी अशी लक्षणे लक्षात येताच शक्य तितक्या लवकर आवश्यक तपासण्या करून वैद्यकीय उपचार घेतल्यास या आजारावर उपचार शक्य असल्याचे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पक्षघात झालेल्या रु ग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर सीटी स्कॅन करावे लागते. त्यानंतर उपचार करण्यासाठी तो नॉर्मल असायला हवा. पहिल्या साडेचार तासांत रु ग्णावर उपचार सुरू केल्यास ३० ते ४० टक्के रु ग्ण बरा होऊ शकतो. अलीकडे जंकफुड, ताणतणाव अशा बदलत्या जीवनशैलींमुळे या रु ग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, हृदयाच्या आजारांमुळे पक्षघात होऊ शकतो. अचानक वेड्यासारखे वागणे हेदेखील त्याचेच लक्षण असू शकते. या आजारावरील उपचार महागडे असल्याचे म्हटले जाते; मात्र वेळीच त्याकडे लक्ष न दिल्यास नंतर बराचसा पैसा खर्चूनही उपयोग होत नाही. त्यामुळे अशाप्रक ारे पक्षघाताच्या झटक्याची लक्षणे जाणवल्यास रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी उपचाराची घाई करणे गरजेचे आहे.पक्षघाताची लक्षणेमेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्याने किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने मेंदूच्या पेशी मृत पावतात.मेंदूच्या कोणत्या भागात आघात होतो यावर पक्षघाताची लक्षणे अवलंबून असतात.ही लक्षणे तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकतात. यात चेंहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणे अथवा लुळा पडणे, वाचा जाणे, बोलण्यामध्ये तोतरेपणा येणे, अचानक अंधुकपणा येणे अथवा दृष्टी जाणे, अचानक डोके गरगरणे, चक्कर येणे आदी लक्षणे दिसून येतात.मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झालेल्या कोशिकांचा रक्तपुरवठा पहिल्या साडेचार तासातच सुरळीत केला असता बहुतांश कोशिका मृत होण्यापासून वाचवता येतात. त्यामुळे ब्रेन अटॅकची तीव्रता कमी होते किंवा ब्रेन अटॅकच्या लक्षणांमध्ये लवकर सुधार होण्यास मदत होते.- डॉ. विजय घुगे,मेंदू विकारतज्ज्ञ, नाशिक
वेळीच उपचाराने पक्षघातावर उपाय शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:37 PM