नाशिक : ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या स्मृतिभ्रंश या आजारावर वेळीच उपचार व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले तर त्यांचा फायदा रुग्णांना होत असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी केले.जागतिक अल्झायमर दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सरकारी रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मेमरी क्लिनिकचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे यांनी मेमरी क्लिनिकचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गुंजाळ, बाह्य विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण, मेट्रन मानिनी देशमुख उपस्थित होते. यावेळी स्मृतिभ्रंश झालेले रुग्ण व त्यांचे नातलग, रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मृतिभ्रंशावर वेळीच उपचार आवश्यक : रावखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:46 AM