शासकीय विश्रामगृहात कोविड संदर्भात शनिवारी (दि. १०) सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी भुसे यांनी सांगितले, रुग्णांना गरज नसतानाही काही नागरिक रेमडेसिवीरचा साठा करीत असून, रेमडेसिवीरबाबत नागरिकांमधील संभ्रम दूर करावा. ज्या रुग्णास इंजेक्शनची गरज आहे तो यापासून वंचित राहता कामा नये, असेही भुसे यांनी सांगितले. लसीकरणाच्या बाबतीत शहरातील मुस्लिमबहुल भागात उदासीनता दिसून येत आहे. यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी, मौलाना, धर्मगुरूंच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, तर पश्चिम भागातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, अशा सूचना भुसे यांनी दिल्या.
इन्फो
अद्ययावत स्थिती फलकावर द्या
सर्व शासकीय व खासगी कोविड रुग्णालयातील उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, आदी माहिती दर्शनी भागावर फलकाद्वारे प्रकाशित करून ती दररोज अद्ययावत करण्यात यावी. सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात आली असली तरी त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. मागील बैठकीत सूचना करूनही एम.बी.बी.एस. दर्जाचे वैद्यकीय अधिकारी भरती न केल्यामुळे व शहरातील स्वच्छतेबरोबर फवारणीच्या कामकाजात उदासीनता दिसून येत असल्याने भुसे यांनी नाराजी व्यक्त केली.
इन्फो
...तर कोविड सेंटरला दाखल करा!
ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रुग्णवाढ दिसत असली तरी एकूण चाचण्यांच्या टक्केवारीनुसार रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील गृहविलगीकरणातील रुग्णांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केली असल्यास अशा रुग्णांना तत्काळ मालेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. ग्रामीण भागातील डी.सी.एच.सी. सेंटर वाढविण्यात येऊन भायगाव येथील कोविड केअर सेंटरचा पूर्णक्षमतेने वापर करावा, असेही भुसे यांनी सांगितले.
फोटो- १० मालेगाव दादा भुसे.
मालेगाव येथे कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी मंत्री दादा भुसे. समवेत अधिकारीवर्ग.
===Photopath===
100421\10nsk_45_10042021_13.jpg
===Caption===
फोटो- १० मालेगाव दादा भुसे.मालेगाव येथे कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी मंत्री दादा भुसे. समवेत अधिकारीवर्ग.