नाशिक : 'मै ना लौटा आनेवाले साल जो, मेरी वर्दी बोले मेरा हाल, तो नैना अश्क ना हों...,' 'हम तों सारे वतन को जगा के चले, याद आयें हमारी तो रोना नहीं...,' ये तेरी जमीं, तेरे खुन सें ही तो सजती-सवरती हैं रांझे, तेरी इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती हैं रांझे...' अशा विविध देशभक्तीपर गीतांच्या ओळी दिवसभर सोशलमिडियावर ऐकवयास अन् वाचवयास मिळाल्या. दोन वर्षांपुर्वी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या ह्यसीआरपीएफह्णच्या जवानांच्या बलिदानाच्या स्मृती रविवारी (दि.१४) नेटिझन्सकडून ताज्या करण्यात आल्या.जम्मु-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या 'कॅन्वॉय'वर अतिरेक्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ साली जम्मु-काश्मिरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी भर दुपारी आत्मघाती हल्ला केल्याच्या घटनेने देश हादरुन गेला होता. या भ्याड हल्ल्यात भारताला आपले ४० सैनिक कायमचे गमावले होते. रविवारी या हल्ल्यातील शहिदांच्या बलिदानाला दोन वर्षे पुर्ण झाली. शहिदांचा द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोशलमिडिया हळहळला. अनेकांनी व्हॅलेंटाईन दिनाचे सेलिब्रेशन बाजुला ठेवत आपल्या शुरवीर जवानांच्या शहिदांच्या स्मृती जागविल्या. व्हॉटस्ॲपचे स्टेटस, डीपींमध्ये सीआरपीएफच्या जवानांना अभिवादन करण्यात आल्याचे दिसुन आले. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांमध्येही पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच सोशलमिडिया त्या कटु हल्ल्याच्या आठवणींनी गहिवरला होता. 'सीआरपीएफ'नेदेखील त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन शहिदांची छायाचित्रे अमर जवान ज्योतीसह पोस्ट करत शत:शत नमन केले. १४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या. तसेच भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल, जम्मु-काश्मिर पोलीस, सीआयएसएफ आदी सुरक्षा दलांच्या वतीने शहिदांना ट्विटरद्वारे अभिवादन करण्यात आले.
याद आयें हमारी तो रोना नहीं...पुलवामा हल्ल्यातील शहिदांना 'नेटिझन्स'कडून अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 2:00 PM
१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या.
ठळक मुद्दे१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होताभारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले शहिदांचा द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोशलमिडिया हळहळला