शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
2
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
3
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
6
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
7
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
8
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
9
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
10
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
11
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
12
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
13
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
14
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
15
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
16
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
17
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
18
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
19
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
20
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'

उपाध्याय यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे

By admin | Published: July 18, 2016 12:37 AM

विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला देशभरात मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या बलिदानाचे स्मरण करीत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले. रावसाहेब सभागृहात पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय : राष्ट्र समर्पित जीवन’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, यशवंत पाटील, श्रीकांत बेनी, धनपाल शाह, नितीन महाजन, नाना शिलेदार, चतूर नेरे, राहुल निर्भवणे, नगरसेवक सतीश सोनवणे आदि प्रमुख पाहुण्यांसह आमदार सीमा हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी घळसासी यांनी दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट व त्यांची विचारसरणीविषयी उपस्थितांना परिचय करून दिला. ते म्हणाले, भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून ते आजच्या भारतीय जनता पार्टीच्या यशामागे पं. दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, सुंदरसिंग भंडारी यांसारख्या राष्ट्राप्रति जीवन समर्पित करणाऱ्या नेत्यांचे बलिदान आहे. जनसंघाने स्थापनेपासून बलिदानच मागितले. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्षपदाची सूत्र सांभाळताना बलिदानाची तयारी असल्याचे विधान केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. त्यामुळे अशा राष्ट्राप्रति समर्पित भावनेतून दिलेल्या बलिदानाच्या पायावर उभ्या असलेल्या सत्तेने हुरळून न जाता भारतीय जनता पार्टीच्या कार्यर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)