सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, निमगाव सिन्नर, केपानगर व हिवरगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासमवेत कोकाटे यांनी सोमवार (दि. १४) रोजी मजीप्रच्या नाशिक येथील कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांची भेट घेवून तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची सद्यास्थिती जाणून घेतली. बारागावपिंप्री योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पाणीपुरवठ्यातील त्रुटी तातडीने दूर होणे आवश्यक आहे. योजनेत समाविष्ट गावांमध्ये जलकुंभ उभारणीसह गावांतर्गत जलवाहिन्या टाकणे आवश्यक आहे. वस्त्यांवर देखील पाणीपुरवठ्यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना कोकाटे यांनी केली. वावी व वडांगळी धरतीवर आठ तासांचे पंपिंग हावर्स गृहीत धरून एक्सप्रेस फिडरसाठी महावितरणामार्फत जिल्हाधिका-यांमार्फत प्रस्ताव पाठवावा, असे ते म्हणाले. यावेळी बारागाव पिंप्रीचे सरपंच योगेश गोराडे, बाजार समितीचे माजी उपसभापती काशिनाथ सानप, विजय उगले, अरूण उगले, शांताराम कु-हाडे, गोरख ताकाटे, कांतीलाल गुंजाळ, सखाहरी मानेकर, श्रीराम सांगळे, देविदास कातकाडे, राजू पोमनर, सूर्यभान ढेपले, दामू मुरडनर, खंडू दिवे आदि उपस्थित होते.
पाणी योजनांतील त्रूटी दूर करा : कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 5:14 PM