नाशिक : विश्वावरील कोरोना संकट नष्ट होऊन हे भयानक सावट दूर व्हावे व लोकजीवन पूर्ववत व्हावे, यासाठी गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे यांच्या मार्गदर्शनानुसर संपूर्ण जगभरातील सेवेकऱ्यांनी विक्रमी अध्यात्मिक सेवेची नोंद केली. कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात महानगरे व ग्रामीण भागात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाने डोके वर काढले तेव्हापासूनच सेवेकरी विविध उपाययोजना करण्यात सक्रिय होते. पण, दुर्दैवाने परिस्थितीत सुधारणा झाली नाही म्हणूनच प. पू. अण्णासाहेब मोरे व चंद्रकांतदादा मोरे यांनी सेवेकऱ्यांना घरच्या घरी मोठ्या संख्येने ऑनलाईन सेवा करण्याचे आवाहन केले.
आवाहनास प्रतिसाद देत एक मे रोजी महाराष्ट्र दिनी लाखो सेवेकऱ्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण करून माता भगवतीस साकडे घातले. तर ९ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा लाखो सेवेकरी बंधू, भगिनी यांनी स्वामी महाराज चरणी सेवा केली, तर ११ मे रोजी रुद्र पठण व अभिषेक करून भगवान शंकरांना मदतीला धावून येण्याचे व कोरोनापासून संपूर्ण मानवजात मुक्त करण्यासाठी आर्त हाक दिली.
या सर्व सेवेत जगभरातून अकरा लाखांपेक्षा जास्त सेवेकरी बंधू, भगिनींनी सहभाग नोंदवला. याच सेवेचा पुढील भाग म्हणून रविवारी (दि. १६) नवनाथ पारायण आयोजित करण्यात आले. यातसुध्दा लाखो सेवेकरी सहभागी झाले होते.
---
अण्णासाहेब मोरे यांचा फोटो एनएसके एडीटवर पाठवला आहे. तो वापरावा