शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

इंग्रजी पाट्या काढा

By admin | Published: September 27, 2015 12:04 AM

राज ठाकरे : चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कचे उद्घाटन

नाशिक : सर्वांना मराठी चांगले कळते व समजते, त्यामुळे उगीचच इंग्रजीतून बोलून वा लिहून मराठमोळ्या नाशिकला कॉस्मोपॉलिटीयन बनवू नका व चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कमध्ये लावण्यात आलेल्या इंग्रजीतील पाट्या तत्काळ बदलून टाका अशा शब्दात महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘नाशिक फर्स्ट’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले. तिडके कॉलनीत नाशिक फर्स्ट संस्थेच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय संयोजकांकडून इंग्रजीतून करण्यात येत होता, त्याचा धागा पकडून ठाकरे यांनी, भाषणाच्या प्रारंभीच नाशिक फर्स्टच्या सदस्यांना आपल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत असे नमूद केले व चांगलेच फैलावर घेतले. येत्या दोन तारखेला आपण पुन्हा नाशिकला येणार असून, तोपर्यंत पार्कमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या इंग्रजीतील पाट्या बदलून टाका, अशी सूचना करतानाच नाशिक फर्स्टने या पार्कसाठी पुढाकार घेतला असला तरी, नाशिक फर्स्ट नव्हे, तर ‘नाशिक महापालिका फर्स्ट’असून, सुमारे ५० कोटी रुपये किमतीची तीन एकर महापालिकेच्या मालकीची जागा दिल्यानेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला अशी पुष्टीही जोडली व संपूर्ण कार्यक्रमात कोठेही महापालिकेचा उल्लेख नसल्याबद्दलची खंतही व्यक्तकेली. मराठी ही राजभाषा असून, त्याचे शिक्षणही मराठीत दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ठाकरे यांनी राज्यात वाहतुकीचा प्रश्न बिकट असून, पूर्वीच्या सरकारचे वारंवार याकडे लक्ष वेधूनही कुंभकर्णी सरकार जागे झाले नाही, असे सांगितले. मुळात वाहतूक व्यवस्थेची काळजी वाहणाऱ्या वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार नसून, दोषी व्यक्ती शंभर, पन्नास रुपये हातावर टेकवून निघून जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अधिकार दिले जावे, अशी मागणी केली. नाशिकचा येत्या वर्षभरात कायापालट झालेला दिसेल याचा पुनरुच्चार करतानाच गोदावरी नदीत शंभर फुटाचे दोन ‘जिनिव्हा फाऊंटन’ करणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली. यावेळी बोलताना माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांनी, चिल्ड्रन ट्रॉफिक एज्युकेशन पार्कचे कौतुक करून संपूर्ण देशासाठी तो रोल मॉडेल होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौर अशोक मुर्तडक यांनी या पार्कसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या कार्मिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव दुबे, ‘लॉर्ड’चे विलास ढवळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचलन जितेंद्र शिर्के यांनी केले. कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, पोलीस आयुक्तएस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, सुजाता डेरे, सुनीता मोटकरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)