नाशिक : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने केलेल्या गैरवापराच्या विरोधात लोकशाही बचाव आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करून ‘इव्हीएम हटावो, बॅलेट पेपर लावो’ अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ होण्याबरोबरच अनेकांची नावे दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित करण्यात आले. मतदार याद्याच सदोष तयार करून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात येऊन या संदर्भात घेण्यात आलेले आक्षेपही फेटाळून लावण्यात आल्याचा आरोप लोकशाही बचाव आंदोलनाने केला आहे. सदोष मतदान याद्यांच्या माध्यमातून भाजपाने आपल्या उमेदवारांना मतदान करवून घेतले असून, या निवडणुकीत इव्हीएमचा वापर करताना वीवीपॅटचे यंत्र जोडण्यात आलेले नाही, त्यामुळे मतदान यंत्रात घोळ झाल्याची तक्रारही केली आहे.
‘इव्हीएम हटावो, बॅलेट पेपर लावो’
By admin | Published: March 04, 2017 1:15 AM