शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

र्थिक व्यवहारातून प्रिंटिंग  व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:48 PM

आर्थिक व्यवहारातून प्रिंटिंग व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्या पत्नीकडे चार-पाच संशयितांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागून धमकावल्याची घटना मंगळवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास घनकर लेनमध्ये घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित महेंद्र प्रताप दळवी, त्याचे दोन ते तीन साथीदार (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) व भाग्याबाई (रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : आर्थिक व्यवहारातून प्रिंटिंग व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्या पत्नीकडे चार-पाच संशयितांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागून धमकावल्याची घटना मंगळवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास घनकर लेनमध्ये घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित महेंद्र प्रताप दळवी, त्याचे दोन ते तीन साथीदार (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) व भाग्याबाई (रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत अरविंद लभडे (४५, रा. घर नंबर ४०२, घनकर लेन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे घनकर लेनमधील आसरा बिल्डिंगमध्ये दुकान असून, तिथे त्यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी दुकानात असताना संशयित महेंद्र दळवी व त्याचे साथीदार दुकानात घुसले़  यानंतर पत्नीला शिवीगाळ करून ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास गेम करण्याची धमकी देऊन गाळ्याचे शटर लावून कुलूप लावले़  दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी वळवी व त्यांच्या साथीदारांविरोधात खंडणी व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे़सोनसाखळी चोरट्यास अटकसोनसाखळी चोरी प्रकरणात फरारी असलेल्या चोरट्यास शिताफीने अटक करण्यात आली. जयभवानी रोडवर गेल्या २४ मार्चला तुळजाई बंगला येथे एका महिलेची सोनसाखळी मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित बबलू रामधर यादव यास शिताफीने पकडले होते. मात्र दुसरा संशयित सागर सुरेश म्हस्के हा गेल्या सात महिन्यांपासून फरार होता. पोलीस सोनसाखळी चोरटा म्हस्के याच्या मागावर होते. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेतील कर्मचारी विशाल पाटील यांना संशयित म्हस्के याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पाटील, डी. के. पवार, विशाल कुंवर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी जयभवानी रोड येथील पेट्रोलपंपाजवळ सोनसाखळी चोरटा म्हस्के यास अटक केली. नाशिकरोड न्यायालयासमोर म्हस्के याला उभे केले असता पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी