पूर परीमाण मारूती : नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराची स्थिती जाणून घेण्याचे एक परीमाण म्हणजे दुतोंड्या मारोती होय. नदीपात्रात या उभ्या मूर्तीच्या पाणी कोठे पोहोचले किंवा मारूती मूर्ती किती बुडाली, यावरून पुराची स्थिती नाशिककर जाणतात. शनिवारपासून सुरू असलेला पावसाचा जोर कमी झाला आणि पूरही ओसरू लागल्याने दुतोंड्या मारूती पूर्णपणे दिसु लागला आहे.नाशिक : पावसाने बुधवारी अचानकपणे पूर्ण उघडीप दिली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ०.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचा जलसाठा ४ हजार ३६३ दलघफू असून धरण ७७.५० टक्के भरले आहे. या धरणावर शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त अवलंबून असल्याने नाशिककरांची चिंता मिटली आहे.आठवडे बाजारात दाखल झालेल्या बहुतांश विक्रेत्यांनी गोवरी पटांगण ते गणेशवाडी रस्त्यावर दुतर्फा दुकानांची संख्या अधिक होती. गोदाकाठावर पाण्याचे प्रमाण कमी जरी असले तरी नेहमीच्या तुलनेत पाण्याची पातळी जास्त होती. सरदार चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंत सांडव्यावरच्या देवी मंदिर परिसरात काही विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. दोन दिवसांपूर्वी गोदाकाठ परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे काहीप्रमाणात नुकसान झाले असून दुकानदार पुन्हा एकदा दुरूस्तीच्या कामाला लागले आहेत. आज काही प्रमाणात काठावरील दुकाने उघडण्यात आली.
पावसाची पुन्हा उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:58 AM
नाशिक : पावसाने बुधवारी अचानकपणे पूर्ण उघडीप दिली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ०.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचा जलसाठा ४ हजार ३६३ दलघफू असून धरण ७७.५० टक्के भरले आहे. या धरणावर शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त अवलंबून असल्याने नाशिककरांची चिंता मिटली आहे.
ठळक मुद्देकाही प्रमाणात काठावरील दुकाने उघडण्यात आली.