गिरीश जोशीमनमाड : पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर मध्य रेल्वेच्या कसारा घाटासह अन्य घाटात डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचे आव्हानात्मक काम करणारी हिल गँग त्यांच्या रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन रॅपलिंगद्वारे रेल्वे संरक्षेतील अत्यंत महत्वाचे व जोखमीचे कार्य करीत आहे.या हिलगँगचे सदस्य डोंगरावर रॅपेलिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रु ळांवर पडण्याची शक्यता असलेल्या सैल व धोकादायक दगड काढून टाकतात. भूस्खलन होण्याची शक्यता असलेले चिखल साफ करतात. पाण्याचा निचरा होण्यासाठी चिखल साफ करणे इत्यादी कामे करून पावसाळ्यात होणाऱ्या कोणत्याही असामान्य घटना टाळतात.जीवाची बाजी लावून काम करणारे हे सदस्य रु ळांवरील उंच आण िउभ्या डोंगरांवर चढतात आण िरॅपेलिंगद्वारे सैल आण िअसुरिक्षत दगड शोधून काढतात.त्या नंतरदररोज ४ ते ५तासांचा ब्लॉक घेवून चिन्हांकित सैल आण िअसुरिक्षत दगड पाडन्यात येतात.यावर्षी केवळ भोर घाट आण िकसारा थूल घाटात ६५० हून अधिक सैल दगड शोधले गेले आणि ते दगड ३ वॅगनच्या विशेष गाडीने साफ करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली. मध्य रेल्वेच्या दहा हिलगॅगनी हे महत्वाकांक्षी आणि धाडसी कार्य पूर्ण केले आहे.या कामासाठी त्यांना सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट (हार्नेस), दुर्बिणी, १०० मीटर दोरी, हँड ग्लोव्हज, सेफ्टी जॅकेट, कटवनी, पहार, फोंक, रेड पेंट, ब्रश, प्रथमोपचार बॉक्स, ५ किलो घन, वेगवेगळ्या आकाराचे हातोडे, शिटी, छिन्नी, वेगवेगळ्या आकाराच्या कु-हाडी, वायरचा पंजा, हँड सिग्नलचा लाल / हिरवा झेंडा आदी सुरक्षा उपकरणे देण्यात येतात. पावसाळ्यात आण ित्यानंतर हिल गॅगचे सदस्य विखुरलेल्या मोकळ्या दगडांचे स्कॅनिंग आणि आवश्यकतेनुसार तोडण्याचे काम करतात.रॉक गिर्यारोहकांसाठी माउंटन रॅपलिंग हे एक साहसी कार्य आहे, परंतु मध्य रेल्वेच्या या टेकड्यांच्या टोळ्यांद्वारे (हिलगॅग) रेल्वेची संरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे कार्य केले जात आहे.
पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर घाटमार्गाची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 6:03 PM
गिरीश जोशी मनमाड : पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर मध्य रेल्वेच्या कसारा घाटासह अन्य घाटात डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचे ...
ठळक मुद्देमनमाड : रेल्वे घाटात हिलगँग योद्धयांची जीवाची बाजी