वणी : बचतगटाच्या १४ महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासानाने सुस्कारा सोडला असून, भीतीचे वातावरण दूर झाले आहे.मानसी बिल्डिंगलगत असलेल्या एका अपार्टमेंटमधील ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यापाठोपाठ सदर इसमाची पत्नी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा यांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. दरम्यानच्या कालावधीत पिंपळगाव येथील फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाधितांचा अहवाल येण्यापूर्वी सदर महिलेने बचतगटाची मीटिंग घेतल्याची बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली.त्या मीटिंगला हजर असलेल्या महिलांना खबरदारी म्हणून पिंपरखेड येथे क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. तेथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले व नाशिकला तपासणीसाठी पाठविण्यात आले. रविवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला व तो निगेटिव्ह आला.दरम्यान, आरोग्य विभागाने या महिलांना होम क्वॉरण्टाइन राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे, दरम्यान बाधित महिलांवर पिंपरखेड येथे, तर या महिलेचे बाधित पती यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असून, वर्तमान स्थितीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
वणीतील १४ महिलांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 5:43 PM
वणी : बचतगटाच्या १४ महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासानाने सुस्कारा सोडला असून, भीतीचे वातावरण दूर झाले आहे.
ठळक मुद्देप्रशासानाने सोडला सुस्कारा : भीतीचे वातावरण दूर