बाजार समितीत येणाऱ्या घटकांची अडचण होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरच अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीत नाशिक शहर जिल्हाभरातून पालेभाज्याची आवक होते. पंधरवड्यापूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ दिवस कडक लॉकडाऊन केले होते. त्यात बाजार समित्याही बंद ठेवल्या होत्या. सोमवारपासून निर्बंध शिथिल करत बाजार समिती सुरू करण्यात आली. बाजार समितीत होणारी गर्दी लक्षात घेऊन बाजार समिती व मनपाच्या माध्यमातून मंगळवारपासून अँटिजन चाचणी सुरू केली होती. त्यात अंदाजे २५० चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
इन्फो====
बाजार समितीत शेतमाल आणावा
बाजार समितीत नियम पालन करत लिलावाला परवानगी दिली आहे. काही शेतकरी बाजार समितीत न येता दिंडोरी रोड तर काही पेठ रोड बाजार समिती बाहेर रस्त्यावरच शेतमाल विक्री करतात. त्यामुळे बाजार समितीसमोर गर्दी वाढत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. रस्त्यावर शेतकऱ्यांचा माल कमी भावात विक्री होतो. शेतकऱ्यांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार बाजार समितीत शेतमाल विक्री करत होणारी फसवणूक लूट थांबविण्याचे आवाहन सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.