कुठलीही आरोग्याची तक्रार नसलेल्या २२ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले, तर ६ जणांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढाकार घेत शिबिर यशस्वी केले. लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित कोविड काळातील पहिल्याच प्लाझ्मा व रक्तदान शिबिरात संचारबंदी व लॉकडाऊन काळातही रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे डॉ.विवेक काळोगे, टेक्निकल सुपरवायझर मनिष सराफ, गणेश भोये, गजानन पावरा, आनंद हाळदे, सुनील पवार यांनी रक्तदान शिबिराची प्रक्रिया पूर्ण केली.
श्री धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक महाजन, लक्ष्मण खैरनार, चंद्रकांत बुटे, संजय वालखेडे, रेखा सावकार, श्री विठ्ठल फाउंडेशन ग्रुप ऑफ कळवणचे संजय पगार, सुनील मालपुरे, लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय अध्यक्ष राजेंद्र मालपुरे, किरण अमृतकार, व्यवस्थापक योगेश कोठावदे, जयेश अमृतकार, योगेश महाजन, अक्षय पगार, प्रवीण चव्हाण, विजय दळवी आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.