ज्वेलरी उद्योगाच्या संस्थांबरोबर चर्चा न करता भारतीय मानक ब्युरोने दागिन्यांच्या शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल केला तसेच एचयूआयडीद्वारे तपासणीची व असंविधानिक पद्धत आणली. ही प्रणाली सराफ व्यावसायिकांसाठी अव्यवहारिक असल्याने कळवण तालुका सुवर्ण सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मैंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयातील शिरस्तेदार महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले. केंद्र शासनाने प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्किंग नंतर एचयूआयडी बंधनकारक केला आहे . त्यास सुवर्णकार बांधवांनी ही किचकट व वेळखाऊ प्रक्रिया असल्याने विरोध दर्शवत एचपीओआयडी ही जाचक अट रद्द करावी अशी मागणी व कळवण तालुका सराफ असोसिएशन व युवा मंच यांनी केली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , केंद्र सरकारच्या हॉलमार्किंगची सक्ती केली. त्याचे स्वागत केले. परंतु त्याचबरोबर याची आयडी लागू केला असून सुवर्णकार उद्योगी हस्तकलेमध्ये मोडले जात असल्याने याला एचयूआयडीची आवश्यकता नाही. तसेच छोट्या मोठ्या गावात सराफ व्यवसाय हा पूर्णत: विश्वासावर केला जात असल्यामुळे तसेच जिओ आयडीसाठी लागणारी तांत्रिक उपकरणे उपलब्ध नसल्याने व आवश्यक मनुष्यबळ नसल्याने एचयूआयडी ही जाचक अट रद्द करावी अशी मागणी केली.
यावेळी कळवण तालुका असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मैंद, उपाध्यक्ष उमेश दुसाने, सरचिटणीस ज्ञानेश्वर दुसाने, देविदास विसपुते, नाना वानखेडे, हरीश विसपुते, राकेश दुसाने, भूषण विसपुते , प्रवीण जाधव , ईश्वर पिंगळे , चेतन मेंद , सागर विसपुते , सागर दुसाने , समाज बांधव व युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोट...
हॉलमार्किंगचे स्वागत आहे. परंतु एचयूआयडी प्रक्रिया ही किचकट असून वेळ व पैसा वाया जाणार आहे . या प्रक्रियेस सुवर्णकार व्यावसायिकांचा विरोध असून केंद्र शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा .
- देविदास विसपुते, व्यावसायिक, कळवण
आमच्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दिले आहे. सराफ व्यावसायिकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविणार असून सराफ व्यावसायिकांना न्याय देऊ, असे आश्वासन मिळाले आहे.
- राजेंद्र मैंद, अध्यक्ष, कळवण तालुका सराफ सुवर्णकार असोसिएशन
फोटो - २४ कळवण १
कळवण येथे सहायक जिल्हाधिकारी मीना यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी राजेंद्र मैंद , उमेश दुसाने, ज्ञानेश्वर दुसाने, देविदास विसपुते, नाना वानखेडे, हरीश विसपुते, राकेश दुसाने
240821\24nsk_32_24082021_13.jpg
कळवण येथे सहायक जिल्हाधिकारी मीना यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी राजेंद्र मैंद , उमेश दुसाने, ज्ञानेश्वर दुसाने, देविदास विसपुते, नाना वानखेडे, हरीश विसपुते, राकेश दुसाने