लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना हॉटस्पॉट ओळख पुसू पाहणाऱ्या मालेगावी सोमवारी ४७९ अहवाल प्राप्त झाले. यात १५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.शहरात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १४ आॅगस्ट रोजी १२१ जणांनी स्वॅब दिला होता. त्यापैकी ३८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे, तर १५ आॅगस्ट रोजी ३०१ जणांनी स्वॅब दिला होता. त्यापैकी १०४ पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमधील ११ अहवालदेखील पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णांमध्ये देवळा तालुक्यातील दहिवड येथील २२ महिला, मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील ३८ वर्षीय महिला, १४ वर्षीय तरुण, २५ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय तरुण, ९ वर्षीय मुलगी, २४ वर्षीय पुरुष, २० वर्षीय पुरुष, खाकुर्डी येथील ३१ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, ५० वर्षीय महिला, ३३ वर्षीय महिला, ०६ वर्षीय बालक, १५ वर्षीय तरुण महिला बाधित मिळून आले.१५ आॅगस्ट रोजी स्वॅब दिलेल्यांपैकी बाधित मिळून आलेले गावातील रुग्णाची संख्या अशी - यात ५८ पुरुष व ४६ महिलांचा समावेश आहे. पुरुष रुग्णांमध्ये १० वर्षाच्या आतील ४ बालकांचा तर १० वर्षीय मुलींचा समावेश आहे. अजंग वडेल ३, तोटेगल्ली कॅम्प १, भायगाव रोड आदी बाधितांचा समावेश आहे.अमृत अपार्टमेंट कॅम्प १, स्वप्नपूर्तीनगर १, देवारपाडे २, संगमेश्वर ५, दसाणे १, पटेलनगर ४. अंबिका कॉलनी १, त्रिवेणी अपार्टमेंट १, श्रीरामनगर ८, पीडब्ल्यूडी आॅफिसजवळ कॅम्प ४, निमगाव खुर्द भुतपाडे १, रावळगाव ६, पवननगर संगमेश्वर १, वडगाव २, झोडगे १, प्रगती कॉलनी १ असे बाधित आढळून आले.
मालेगावी १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 9:31 PM
मालेगाव : शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना हॉटस्पॉट ओळख पुसू पाहणाऱ्या मालेगावी सोमवारी ४७९ अहवाल प्राप्त झाले. यात १५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
ठळक मुद्देकोरोना : आरोग्य विभाग सतर्क