नाशिक : शहरातील रुग्णसंख्या मर्यादित असताना बुधवारी (दि.२०) शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया चार जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अर्थात, हे सर्वजण बाहेरून आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांची संख्या ४८ हीच कायम असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत ४८ बाधित रुग्ण असून, त्यातील ३८ जण बरे होऊन घरी गेल्याने सध्या केवळ बारा रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी (दि.२०) शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाºया चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि उपचार घेण्याच्या आधी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आलेली आहे. यात हे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील ८४ वर्षांचे एक ज्येष्ठ नागरिक १६ मे रोजी मुंबईहून नाशिकला आले होते. त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास झाला म्हणून खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दुसरा रुग्ण मुंबई येथील आहे. पंचवटीत राहणाºया मुलाकडे ते आल्यानंतर हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तिसºया घटनेत जळगाव येथील एक पोलीस कर्मचारी उपचारासाठी नाशिकमध्ये दाखल असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर संगमनेरच्या निमोण येथील एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मुलाने उपचारासाठी नाशिकमध्ये बोलावून थेट रुग्णालयात दाखल केले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे आज नाशिक शहरामधील कोणताही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह नाही म्हणून कुठलेही नवीन प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिले आहेत.---------------------------------घरोघर तपासणी मोहीमकोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून शहरांमधील सर्व झोपडपट्ट्या व स्लम भागामध्ये आरोग्य पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकला असे लक्षण असलेले रुग्ण शोधण्यात येत असून, ते आढळून आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत. याकरिता मनपाने पथके तयार करण्यात आलेली असून, त्यांचेमार्फत सुमारे ६९ हजार घरांमधील ३ लक्ष नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे.
शहरात उपचार घेणाऱ्या चौघांचे अहवाल आले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:21 PM