सिन्नर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सिन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. याप्रकरणातील हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.समाजकंटकांकडून रामदास आठवले यांच्यावर करण्यात आलेला हल्ला घृणास्पद व निंदनीय असून या हल्ल्यात कारणीभूत असणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन आरपीआयचे तालुका अध्यक्ष मंगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. आठवले यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करणाºया घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. आठवले हे सामान्य जनतेच्या अडचणी सोडविणारे नेते आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी संजय जाधव, शरद जाधव, गणेश जाधव, रमेश जाधव, कल्पना रणशेवरे, वनिता जगताप, मिलींद साळवे, नाना पवार, अमोल जगताप, गोपी दराडे, अंकुश जाधव, पप्पू गोडसे, मिलींद गायकवाड, विकास त्रिभूवन आदींसह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सिन्नर येथे रिपाइंतर्फे हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 5:52 PM