नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत भरविर बुद्रुक येथील जनता विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कोरोनाची आचारसंहिता सामाजिक भान पाळत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला.यावेळी भरविर बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन झनकर यांनी विद्यार्थ्यांसाठी हॅन्ड वॉश, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश स्टॅण्ड, थर्मामीटर, ऑक्सिमिटर स्वखर्चाने भेट म्हणून दिले. शासनाच्या आदेशानुसार २७ जानेवारी पासून राज्यभरात शाळा टप्याटप्याने चालू करण्यात आल्या असल्या तरी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सरंक्षणासाठी किंबहुना विद्यार्थ्यांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्गाला हॅन्ड वॉश, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, स्टॅण्ड तसेच दैनंदिन विद्यार्थ्यांची थर्मल तपासणी करण्यासाठी थर्मामीटर, ऑक्सिमिटर आदीं साहित्यचे सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन झनकर यांनी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जनता विद्यालय भरविर बुद्रुक या शाळेला भेट दिले.यावेळी श्री झनकर यांचे ग्रामस्थांनी शालेय तसेच शिक्षकवृंद यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सी. बी. रुपवते, राधाकिसन झनकर, साहेबराव झनकर, हेमंत झनकर, त्र्यंबक झनकर, नवनाथ झनकर, सुधाकर झनकर, साहेबराव झनकर, शिवाजी झनकर, शिवाजी जुंद्रे आदींसह शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.जनता विद्यालय भरविर येथे प्रजासत्ताक दिनी हॅन्ड वॉश, मसॅनिटायझर स्टँड साहित्य देतांना राधाकिसन झनकर यांच्यासमवेत ग्रामस्थ शिक्षक वृंद. (२७ नांदुरववैद्य १, २).
भरविर येथील विद्यालयात प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 6:49 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत भरविर बुद्रुक येथील जनता विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कोरोनाची आचारसंहिता सामाजिक भान पाळत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला
ठळक मुद्देविद्यार्थ्यांसाठी हॅन्ड वॉश, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश स्टॅण्ड, थर्मामीटर, ऑक्सिमिटर भेट