शासकीय ध्वजारोहण-
मालेगाव पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या हस्ते झाले. महापौर ताहेरा रशीद शेख, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, उपमहापौर निलेश आहेर, पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, प्रदीपकुमार जाधव, तहसीलदार चंद्रजित राजपूत, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्रिलोकचंद पहाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल पाटील, निखिल पवार, प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संविधानाचे महत्त्व विषद करताना आमदार मौलाना मुफ्ती यांनी संविधानाच्या समितीला शुभेच्छा दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले तर उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनीही मार्गदर्शन केले.
पोलीस कवायत मैदानावर सकाळी मुख्य शासकीय ध्वजारोहण अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या हस्ते पार पडले. राज्य राखीव पोलीस दल व होमगार्डच्या जवानांनी संचलन केले, तर अग्निशमन दलामार्फत मानवंदना देण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आमदार मुफ्ती यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
–-----------------
वनाधिकारी कार्यालय
मालेगाव येथील उपविभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे यांच्या नेतृत्वात सर्व वनपाल यांनी मानवंदना दिली. यावेळी वन विभागाचे लेखापाल योगेश अभंग, सुनील पाटील, एस. व्ही मानकर, सर्वेअर नंदू बोरसे, वनपाल बी एस सूर्यवंशी, व्ही एस बोरसे, ए जी शिंदे, आर व्ही देवरे व वनकर्मचारी उपस्थित होते.
---------------
कळवाडी विद्यालय
पाडळदे : कळवाडी येथील व्यंकटराव भाऊसाहेब हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य के. व्ही. काकळीज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य काकळीज होते .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राहुल देसले, राजपूत, उपमुख्याध्यापक .एस.बी.देवरे , पर्यवेक्षक एस.एल.शिंदे उपस्थित होते. जेष्ठ नागरिक श्री. यशवंत देसले यांच्या हस्ते विद्यालय प्रांगणातील महादेवाच्या मंदिरात पुष्प अर्पण करण्यात आले. संविधानामधील उद्देशिका यांचे वाचन जेष्ठ शिक्षक एस.पी.निकम यांनी केले. सूत्रसंचालन के.डी.वाकळे यांनी केले. आभार आर.यु.वाघ यांनी मानले.
–---------------- ----वर्धमान शिक्षण संस्था---------------------
मालेगाव – येथील वर्धमान शिक्षण संस्थेत श्री र.वी.शाह माध्यमिक विद्यालयात संस्थेचे विश्वस्त भालचंद्र पारेख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालयात नितीन शाह यांच्या हस्ते तर सौ.का.र.शाह प्राथमिक विद्यालयात माजी उपाध्यक्ष प्रदीप मर्चंट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक पटणी, उपाध्यक्ष परेश शाह, अभय शाह, सचिव प्रताप शाह, सहसचिव गौतम प्रकाश शाह, गौतम रमेशचंद्र शाह, कोषाध्यक्ष शिरीष पटणी, सहकोषाध्यक्ष पद्मेश मेहता, विश्वस्त प्रकाश शाह, माजी उपाध्यक्ष किर्तीकुमार शाह, रंजनाबेन शाह, शालिनी शाह, प्राचार्य विवेक कासार, पर्यवेक्षिका स्मिता पाटील, मुख्याध्यापक नितीन ठाकरे, जयश्री गुंजाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘ऑनलाईन अध्ययनाचे फायदे’ या हस्तपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षिका वाय.ए.वाघ व डी.एस.पगार यांनी याचे लेखन केले. यानंतर लॉकडाऊन काळात झालेल्या विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनी आस्था कांडेकर ( १० वी फ), सायली बोबडे ( १० वी अ), जया पवार ( ९ वी इ ) यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. भालचंद्र पारेख यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आर.एल.फडके यांनी केले.
---–-------------------
फार्मसी महाविद्यालय, मुंगसे
पाटणे: मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील फार्मसी महाविद्यालयात संस्थेच्या अध्यक्षा संगीता सूर्यवंशी व माजी सैनिक स्वप्नील पगारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव आर.आर.सूर्यवंशी, माजी सैनिक स्वप्नील पगारे, संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी,विजय सूर्यवंशी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.शीतल सोनावणे यांनी केले तर प्रा. मनोहर निकम यांनी आभार मानले .
------–------------
एल. व्ही. एच. विद्यालय मांजरे
पाटणे: मालेगाव तालुक्यातील मांजरे येथील एल. व्ही. एच.माध्यमिक विद्यालयात ,मांजरे तालुका मालेगाव येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक एस.एस. मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपसरपंच जितू निकम, सदस्य सोनू निकम व ग्रामसेवक भारत बच्छाव,दिगंबर निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख जे.एस.याळीस यांनी केले.संविधानाचे वाचन आर .वी.पाटील यांनी केले,अनुमोदन बोरसे एस. के .यांनी दिले आभार एस. डी. आहेर यांनी मानले.
-----------–---
पाटणे येथे सैनिकांचा सन्मान
पाटणे: येथे एसटी स्टँड येथील रिक्षा युनियनचे ध्वजारोहण सैनिक प्रसाद त्रिभुवन यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक अमोल बागुल, किरण बागुल, समाधान खैरनार, माजी सरपंच नथू खैरनार, वसंत खैरनार ,हिरामण खैरनार ,अमोल आहिरे, साहेबराव धनवट ,साबीर शेख तसेच सरपंच उपसरपंच उपस्थित होते. यावेळी रिक्षा युनियनच्या वतीने उपस्थित सैनिकांचा सत्कार करण्यात आला. पाटणे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच राहुलाबाई आहिरे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच जयश्री शेवाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पाटणे सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन जीवन अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सखाराम गोसावी उपस्थित होते. गांधी चौक येथे सेवानिवृत्त तलाठी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.