राजापुर . येवला तालुक्यातील राजापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांनी केले व आश्रम शाळेचे ध्वजारोहण सैनिक दादा वाघ यांनी केले तर राजापूर पर्णकुटी ध्वजारोहण सैनिक मंगेश बोडखे यांनी केले.पर्णकुटी येथे आजी माजी सैनिक तसेच पोलीस कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहणाची प्रथा आहे. राजापूर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण राजापूर पंचायतीचे प्रशासक रामदास मंडलिक यांनी केले. राजापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नवनाथ वाघ यांनी केले. राजापूर माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण तुळशीराम विंचु यांनी केले.वाघ वस्ती शाळेचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर दराडे यांनी केले. भैरवनाथ वाडी शाळेचे ध्वजारोहण सुभाष राधाकिसन वाघ यांनी तर हवालदार वस्ती शाळेचे ध्वजारोहण सैनिक सोन्या वाघ यांनी केले. हवालदार वस्ती येथे सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते, तसेच अलगट वस्ती शाळेचे ध्वजारोहण सोमनाथ अलगट यांनी व नाईक वस्ती शाळेचे ध्वजारोहण अरुण धात्रक व शंकर लांडगे यांनी केले.सौरऊर्जा कंपनीचे ध्वजारोहण परशराम दराडे, एकनाथ आव्हाड यांनी केले. गणाधीश शाळेचे ध्वजारोहण येवला येथील आरोग्य अधिकारी डॉ. रुपाली ठाकूर यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सदस्य व व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजापूर येथे प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 6:54 PM
राजापुर . येवला तालुक्यातील राजापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांनी केले व आश्रम शाळेचे ध्वजारोहण सैनिक दादा वाघ यांनी केले तर राजापूर पर्णकुटी ध्वजारोहण सैनिक मंगेश बोडखे यांनी केले.
ठळक मुद्देपर्णकुटी येथे आजी माजी सैनिक तसेच पोलीस कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहणाची प्रथा