महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत या प्रभागातून मनसेचे अशोक मुर्तडक, भाजपच्या भिकूबाई बागुल, पुंडलिक खोडे, सुनीता पिंगळे असे चौघे निवडून आले होते. पाच वर्षांत राजकीय चित्र बदलले असून, भिकूबाई बागुल यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या निवडणुकीत बागुल यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या मुर्तडक मनसेकडून रिंगणात उतरले होते. मुर्तडक आत्तापर्यंत पाचवेळा निवडून आले आहे, आता राजकीय चित्र बदलले असले तरी मनसेची पकड मजबूत असून, भाजपला मनसे आणि महाविकास आघाडीचे आव्हान राहणार आहे.
अर्थात, महाविकास आघाडीला मनसेचे अशोक मुर्तडक यांच्यासमोर मोठी ताकद लावावी लागेल. सुनील बागुल सेनेत परतले असले तरी मात्र त्यांच्या मातोश्री भाजपत आहेत, मुलगा भाजयुमो पदाधिकारी आहे त्यामुळे आगामी निवडणूक ते भाजपकडून की शिवसेनेकडून लढणार, असा संभ्रम कायम ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
इन्फो बॉक्स
प्रभागातील समस्या
- प्रभागात अनेक ठिकाणी आजही दैनंदिन घंटागाडी अनियमित
- नवीन वसाहत झालेल्या नागरी वसाहतीत पक्के रस्ते नाही.
- उघडे नाले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दूषित पाणीपुरवठा, उघड्या वीजतारा कायम आहे.
- प्रभागाला महापौर, उपमहापौरपद लाभूनही लक्षवेधी प्रकल्प नाही
इन्फो बॉक्स
स्मार्ट सिटी काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रभागात सर्वच ठिकाणी खड्डेच खड्डे निर्माण झाले आहे. स्थानिक सर्व
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. रामवाडीत रस्ते दुरवस्था झाली आहे.
- मनीषा हेकरे, माजी नगरसेवक
इन्फो बॉक्स
संभाव्य उमेदवार
भाजप : श्रीमती भिकूबाई बागुल, पुंडलिक खोडे, मनीष बागुल, प्रा. परशराम वाघेरे, दामोदर मानकर, विमल आखाडे, वाळू काकड, सिंधू खोडे, वैशाली अहेर, जयश्री लोंढे, ऋषिकेश अहेर, ज्ञानेश्वर काकड,
शिवसेना : मामासाहेब राजवाडे, मनीषा हेकरे, संजय बागुल, हरिभाऊ काळे, विलास गाडगीळ, अंकुश काकड, चिंतामण उगलमुगले, कल्पना पिंगळे,
राष्ट्रवादी काँग्रेस : ॲड. सुरेश आव्हाड, अविदा शेळके, कविता आव्हाड, शंकर पिंगळे, मोतीराम पिंगळे, जयश्री जाधव, महेश शेळके, रूपाली काळे
मनसे - अशोक मुर्तडक.
इतर - प्रमोद पालवे, डॉ. जगन्नाथ तांदळे, अरुण थोरात, आप्पा
शिंदे, दिलीप खेडकर.
---
छायाचित्र अशोक मुर्तडक आणि भिकूबाई बागुल.