शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खोट्या निवेदनांविरुद्ध घरकुल लाभार्थ्यांचे निवेदन

By admin | Published: March 09, 2016 10:51 PM

पालिकेवर धडक : आठवडाभरात सर्वेक्षणाचे काम

 नाशिक : महापालिकेकडे काही लोक खोटी निवेदने, माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करत मूळ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळू देण्यात अडथळे उत्पन्न करत असल्याची तक्रार करत संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवाजीवाडी, नंदिनीनगर आणि भारतनगरमधील रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली.शिवाजीवाडी, नंदिनीनगर आणि भारतनगरमधील सुमारे १६८ लाभार्थ्यांची यादी मंजूर असतानाही काही लोक खोटी निवेदने, अर्जफाटे करून घरकुलांपासून वंचित ठेवत असल्याची तक्रार मांडत परिसरातील महिलांनी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्याकडे कैफियत मांडली. नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या महिलांनी खोटी निवेदने देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, २०१३ मध्येच रहिवाशांनी आपली घरे स्वत:हून हटविली होती. त्यातील अनेक लाभार्थ्यांची रीतसर यादीही मंजूर झाली आहे; परंतु माहितीच्या अधिकारात अर्ज, निवेदने देऊन जाणूनबुजून काही लोक लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करताना अडथळे आणत आहेत. अनेकांना घरकुले देण्यात आली; परंतु त्यांनी अजूनही त्यांची जुनी घरे हटविलेली नाहीत. संबंधितांवरही फौजदारी कारवाई करावी. तर काही लोकांनी आपली घरकुले गहाण टाकलेली असल्याची तक्रारही संबंधित रहिवाशांनी केली. येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास मनपावर मोर्चा आणण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)