दिंडोरी : तालुक्यातील पश्चिम भागातील मोठे गाव उमराळे बु।। येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.दिंडोरी - उमराळे या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून, त्यामुळे अपघात होत आहेत. अवेळी भारनियमन केले जाते. दिवसा भारनियमन तर रात्रीच्या वेळी वीज राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जाऊन पाणी भरावे लागते. गावातील बीएसएनएल केंद्रातील यंत्रणा विजेअभावी बंद राहते. यामुळे गावातील नेट बंद झाल्यास सर्व कामे व व्यवहार ठप्प होत आहेत या समस्यांवर उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच अशोक धात्रक, कृउबा समितीचे संचालक रामदास धात्रक, तालुका विक्र ी संघाचे व्हा. चेअरमन डॉ. पुंडलिक धात्रक, विकास धात्रक आदींनी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उमराळे ग्रामस्थांचे मागण्यांसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 11:08 PM
दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागातील मोठे गाव उमराळे बु।। येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
ठळक मुद्दे गावातील बीएसएनएल केंद्रातील यंत्रणा विजेअभावी बंद