सिन्नर : नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शालार्थ आयडी प्रलंबित असलेल्या सर्व शिक्षकांच्या फाईल १० जानेवारी पर्यंत पूर्ण करून देण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील फाईलही २५ जानेवारीपर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. प्रलंबित शालार्थ आयडीसाठी विविध संघटनेच्या शिष्टमंडळाने एकत्र जात अधिकाऱ्यांना घेराव घालत निवेदन दिले.प्रलंबित शालार्थ आयडीच्या फाईल मार्गी लागत नसल्याने सबंधित शिक्षकांचे ३ वर्षांपासून वेतन रखडले आहे. त्याविरोधात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना व शिक्षक भारती आदींच्या पदाधिकाºयांनी शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे आयुक्त कार्यालयात जाऊन अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारला. शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनी व्यवस्थित पाठवलेल्या फाईल काढल्या जात नाही, त्यामध्ये मोठया प्रमाणात दप्तर दिरंगाई होते. शिक्षक गेल्या तीन वर्षापासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहे त्याचे संसार उघडयावर पडण्याची वेळ आली आहे.
शालार्थ आयडीसाठी शिक्षण आयुक्तांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 5:50 PM