दाभाडी : वस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा ग्राह्य धरावी यासाठी वस्तीशाळा शिक्षक समन्वय समितीतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले. तेरा ते चौदा वर्ष एक ते तीन हजार मानधनावर काम करणारे वस्तीशाळा शिक्षक २००१ पासून सेवेत असूनही त्यांची सेवा १ जानेवारी २०१४ पासूनच ग्राह्य धरण्यात आली. बारा वर्ष सेवेनंतर मिळणारी चटोपाध्याय वेतनश्रेणीही लागू नाही. अनेक शिक्षक सेवानिवृत्तीला असल्याने त्यांना कुठलाच लाभ होणार नाही, असे संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन तारांकित प्रश्नासह मंत्रालयीन बैठकीत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असे भुसे यांनी सांगितले. यावेळी पृथ्वीराज शिरसाठ, विनायक ठोंबरे, संदीप सूर्यवंशी, राकेश पाटील, नाजीम देशमुख, उज्ज्वल हिरे, सुनील शेलार, गणेश हिरे, साहेबराव हिरे, गणेश हिरे, दादाजी अहिरे, सुनील मोरे, शरद पवार, ज्ञानेश्वर दुसाने, महेंद्र शेवाळे, मोठाभाऊ हिरे, पिंटू उशिरे, महेश पाटील व वस्तीशाळा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वस्तीशाळा शिक्षक समन्वय समितीचे राज्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:00 AM