नाशिक : जागतिक कर्णबधीर दिनाच्या निमित्ताने मूकबधीर असोसिएशनच्यावतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.सकाळी रचना विद्यालय येथून निघालेली ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्यावेळी शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले. त्यात कर्णबधीर दिन साजरा करण्यासाठी शासकीय व निमशासकीय,खासगी संस्थांमधील कर्मचाºयांना विशेष रजा दिली जावी, मुकबधीर व्यक्तींना वाहन परवाना देण्यात यावा, इतर अपंगाप्रमाणे हक्क व समान न्याय मिळावा, मुकबधीरांची जी सांकेतीक भाषा आहे त्याला भाषेचा दर्जा मिळावा, मुकबधीरांसाठी सांकेतिक भाषेत शिक्षण उपलब्ध नसल्याने नोकरीत उच्च शिक्षणाची अट ठेवू नये, अपंगत्वाचा दाखला त्वरीत देण्यात यावा, सरकारी नोकºयांमध्ये मुकबधीर अपंगत्वाच्या जागा त्वरीत भराव्यात, मुकबधीरांची चेष्टा करणाºयांना कडक शासन करावे, सार्वजनिक ठिकाणी कर्णबधीरांना सहकार्य करावे, अपंग कायदा १९९५ नुसार कर्णबधिरांना सामान्य शाळेत सन्मानपुर्वक मोफत शिक्षण द्या आदी मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत. या रॅलीत गोपाळ बिरारे, सतीश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मुकबधीर व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
मूकबधीरांचे रॅलीद्वारे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 3:06 PM