नाशिक : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थी जुन्या यादीमध्येही असल्याने त्यांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे, रेशन दुकाने स्थानिक परिस्थिती पाहून उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी, धान्य हे व्यक्तीऐवजी कार्डाप्रमाणे देण्यात यावे, म्हणजे तक्रारी कमी होतील, दुकानपोच धान्य मिळावे आदि मागण्या करण्यात आल्या. यावेळी सलीम पटेल, दिलीप तुपे, सतीश आमले, गणेश कांकरिया, योगेश बत्तासे, दिलीप मोरे, महेश सदावर्ते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेशन दुकानदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: September 02, 2016 12:35 AM