विंचूर : ऐन दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान विंचूरसह परिसराला वीजपुरवठा करणाºया विष्णुनगर येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर गेल्या दहा बारा दिवसांपासून जळाल्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांसह शेतकरीवर्गदेखील हैराण झाला आहे.पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विंचूर परिसर, विष्णुनगर व हनुमाननगर गावांमधील सरपंच व नागरिकांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी लासलगाव महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जे.एस. ठाकूर, चव्हाण यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने त्यांचेही नुकसान होत आहे. संपूर्ण दाब हा एकाच ट्रान्सफॉर्मरवर असल्याने लवकरात लवकर दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवावा, शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जे. एस. ठाकूर, चव्हाण यांना देण्यात आले. याप्रसंगी विंचूर सरपंच ताराबाई क्षीरसागर, विष्णुनगरचे सरपंच किशोर मवाळ, हनुमाननगर सरपंच शोभा भडांगे, ग्रामपंचायत सदस्यांसह निवृत्ती ठुबे, धनाजी जाधव, वसंत कडलग, आबासाहेब दरेकर, किशोर दरेकर, गोरख शेळके, अशोक दरेकर, रामकृष्ण दरेकर, बाळू ठुबे, विकी दरेकर, नाना भडांगे, ज्ञानेश्वर देसले, विलास जेऊघाले, दीपक घायाळ, केशव क्षीरसागर यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
उपअभियंत्यांना निवेदन : विंचूर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण रोहित्र जळाल्याने सिंगल फेजचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:10 AM
विंचूर : ऐन दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान विंचूरसह परिसराला वीजपुरवठा करणाºया विष्णुनगर येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर गेल्या दहा बारा दिवसांपासून जळाल्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांसह शेतकरीवर्गदेखील हैराण झाला आहे.
ठळक मुद्देट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे